
सोन्याचे दागिने परिधान करायला प्रत्येकालाच आवडते. सोन्याचा संचय करणे हे एका अर्थाने आर्थिक दृष्टीने स्थैर्य करणारे आहे. म्हणूनच अनेकजण सोन्याचे दागिने तयार करतात. तर काही लोक सोन्याचे नाणे, सोन्याचे बिस्कीट या स्वरुपात सोन्याचा संचय करतात.
कठीण काळात हाच सोन्याचा धातू तुमच्या मदतीला धावून येतो. परंतु सध्या सोन्याच्या भावात कधी घसरण पाहायला मिळत आहे. तर कधी सोनं महाग होताना पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे.आज सोन्याच्या दरात प्रती 10 ग्रॅममागे 800 रुपयांची तर चांदीच्या दरात प्रतिक किलोमागे 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे.
ताज्या माहितीनुसार सोन्याचा दर जीएसटीसह प्रति एक तोळा 1 लाख 52 हजार 234 रुपयांपर्यंत घसरला आहे. तर चांदीचा भाव प्रति किलोमागे 2 लाख 52 हजार 350 रुपयांपर्यंत घसरला आहे.
गेल्या चार दिवसांपासून सोन्याने चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच संधी आहे का? असे विचारले जात आहे. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)