Headlines

IPL Points Table 2026: केकेआरची विजयासह मोठी उडी, प्लेऑफमधील आव्हान कायम, असं आहे समीकरण

IPL Points Table 2026: केकेआरची विजयासह मोठी उडी, प्लेऑफमधील आव्हान कायम, असं आहे समीकरण
IPL Points Table 2026: केकेआरची विजयासह मोठी उडी, प्लेऑफमधील आव्हान कायम, असं आहे समीकरण


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसामात (IPL 2026) प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झालेले आहेत. गतविजेता आरसीबीने सर्वातआधी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादसह गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये धडक दिली. तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं साखळी फेरीतूनच पॅकअप झालंय. त्यामुळे आता उर्वरित 1 जागेसाठी 5 संघांत चुरस आहे. या 5 पैकी राजस्थानला प्लेऑफमध्ये स्वत:च्या जोरावर पोहचण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला इतर 4 संघांचं प्लेऑफचं समीकरण हे जर आणि तर असं आहे. मात्र असं असलं तरी या संघांना प्लेऑफची आशा आहे.

केकेआरचा मुंबईवर 4 विकेट्सने विजय

कोलकाता नाईट रायडर्सने पावसाने प्रभावित झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. स्पर्धेतील 65 वा सामना हा बुधवारी खेळवण्यात आला. मात्र निकाल गुरुवारी 21 मे रोजी लागला. केकेआरने हा सामना जिंकून 2 गुण मिळवले आणि प्लेऑफमधील आपली आशा कायम राखण्यात यश मिळवलं. केकेआरने यासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली.

केकेआरचे 13 सामन्यानंतर 13 गुण झाले आहेत. तसेच केकेआरने या विजयासह सहाव्या स्थानी झेप घेतली. मुंबई विरूद्धच्या विजयाआधी केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी होती. केकेआरचा नेट रनरेट हा सामन्याधी -0.38 असा होता जो सामन्यानंतर +0.011 असा झाला. तसेच केकेआरने पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ल कॅपिट्ल्सला मागे टाकलं आहे. चेन्नई आणि दिल्लीच्या नावावर प्रत्येकी 12-12 गुण आहेत. मात्र नेट रनरेट चांगला असल्याने चेन्नई सातव्या आणि दिल्ली आठव्या स्थानी आहे.

राजस्थान-पंजाबमध्ये चुरस

ताज्या आकडेवारीनुसार, पंजाबच्या खात्यात 13 सामन्यानंतर 13 गुण आहेत. पंजाब पाचव्या स्थानी आहे. तर राजस्थान चौथ्या स्थानी आहे. राजस्थानचे 13 सामन्यांनंतर 14 गुण आहेत. त्यामुळे राजस्थानला साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे.

राजस्थानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना हा 24 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. मुंबईचाही हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. राजस्थानने हा सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये पोहचतील. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे चेन्नई, दिल्ली, पंजाब आणि केकेआरचं लक्ष असणार आहे.

केकेआरचं समीकरण काय?

केकेआर टीमचं प्लेऑफमधील पोहचण्याचं समीकरण कसं असेल? हे जाणून घेऊयात. पंजाब किंग्सचा त्यांच्या मोहिमेतील शेवटचा सामना हा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 23 मे रोजी होणार आहे. पंजाबचा या सामन्यात पराभव व्हावा. पंजाबचे पराभवानंतर 13 गुणच राहतील. तसेच पंजाबने हा सामना जिंकला तरी त्यांचे 15 गुण होतील.

त्यांनतर राजस्थानचा रविवारी 24 मे रोजी मुंबई विरुद्ध दुपारी होणाऱ्या सामन्यात पराभव व्हावा. राजस्थानचा पराभव झाल्यास त्यांचे 14 गुणच राहतील. त्यानंतर केकेआरला आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकावा लागेल. केकेआरसमोर शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. केकेआरने हा सामना जिंकल्यास त्यांचे 15 गुण होतील.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?


केकेआरने दिल्ली विरुद्धचा हा सामना मोठ्या फरकाने जिंकायला हवा. केकेआर जिंकल्यास कोलकाता आणि पंजाबचे समसमान 15 गुण होतील. अशा वेळेस नेट रनरेटच्या आधारावर प्लेऑफसाठीचा चौथा संघ निश्चित होईल. त्यामुळे केकेआरला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर मोठ्या फरकाने दिल्ली विरुद्ध विजयी व्हावं लागणार आहे. त्यामुळे केकेआरचाही चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच अनुभवायला मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *