Headlines

Made in Pakistan : चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? त्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Made in Pakistan : चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? त्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
Made in Pakistan : चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? त्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ


चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तानी वस्तू ?

भारत-पाकिस्तान संबंध ताणलेले आहेत, दोन्ही देशांमधील तणाव काही नवीन नाही, तो सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी झालेला पहलगाम हल्ला, निष्पाप नागरिकांचा गेलेला जीव, ऑपरेशन सिंदून, यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखीनच वाढल्याचे दिसून आले. पाकिस्तानी क्रिकेटर, गायक, खेळाडू, कलाकार, त्यांचे चित्रपट यांना भारतात बंदी घालण्यात आली. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात प्रत्येक भारतीयाच्या मनात एक राग असतो. मात्र याचदरम्यान एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे, ती देखील पुण्याजवळच्या पिंपरी-चिंचवड येथून.

पिंपरी-चिंचवड शहरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री केली जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. कारण शहरातील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतून असा प्रकार समोर आल्याचं बोललं जात आहे.या मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या यात्रेत कथितपणे ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा दावा एका महिलेने केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून त्यामुळे अनेक जण संतापले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

चादरीवर लिहीलंय Made in Pakistan ?

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने यात्रेतून खरेदी केलेली एक चादर दाखवली. तिच्या म्हणण्यानुसार, तिने यात्रेतून काही गोष्टी खेरदी केल्या, त्यातच ही चादरही होती. ती चादर धुतल्यानंतर एका कोपऱ्यात लपलेलं हे लेबल तिच्या नजरेस पडलं, ते फोल्ड केलेलं होते. महिलेने ते लेबल उघडून पाहिलं असता, त्या लेबलवर ‘Made in Pakistan’ असा उल्लेख असल्याचा दावा तिने केला आहे. आपण काह बॉर्डरवर वगैरे रहात नाही, बॉर्डरपासून हजारो किमी दूर राहतो, महाराष्ट्रात, पुण्याजवळ. तरी आपल्या इथे अशी मेड इन पाकिस्तान वस्तू मिळावी ? हे पाहून माझा अगदी संताप होतोय, असं म्हणत त्या महिलेने तिचा राग व्यक्त केला.

मात्र त्या महिलेच्या या कथित दाव्यानंतर यात्रांमध्ये आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उगमाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रस्त्यावरील स्टॉल आणि तात्पुरत्या विक्री केंद्रांवर उपलब्ध वस्तूंची पुरेशी तपासणी केली जाते का, असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत कशा पोहोचल्या ?

व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देशात पाकिस्तानी वस्तूंवर निर्बंध आहेत, मग तरीही अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत कशा पोहोचल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून अनेकांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी व्हिडिओतील दावे आणि वस्तूवरील लेबलची अधिकृत पडताळणी झाल्यानंतरच निष्कर्ष काढावेत, अशी भूमिका मांडली आहे. नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्यावरील उत्पादन तपशील, उत्पादक कंपनीची माहिती आणि मूळ देशाची नोंद तपासावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

मात्र, या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी ही चादर नेमकी कुठून आली, ती अधिकृतपणे आयात झाली होती की नाही, तसेच विक्रेत्याची बाजू काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *