Headlines

MI vs LSG Live Score Updates, IPL 2026: मुंबईचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, लखनौवर 6 विकेट्सने मात

MI vs LSG Live Score Updates, IPL 2026: मुंबईचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, लखनौवर 6 विकेट्सने मात
MI vs LSG Live Score Updates, IPL 2026: मुंबईचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, लखनौवर 6 विकेट्सने मात


  • 04 May 2026 11:22 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : मुंबईचा आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, लखनौवर 6 विकेट्सने मात

    मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेजिंग करताना सर्वात मोठा विजय मिळवला आहे. मुंबईने लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. लखनौने मुंबईसमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला.

  • 04 May 2026 11:15 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला चौथा धक्का

    लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला चौथा झटका  गिला आहे. मोहम्मद शमी याने सूर्यकुमार यादव याला मोहम्मद शमी याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. सूर्याने 12 धावा केल्या.

  • 04 May 2026 11:02 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : मुंबईला तिसरा झटका, तिलक वर्मा आऊट, सामना रंगतदार स्थितीत

    लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला तिसरा झटका दिला आहे. सिद्धार्थने तिलक वर्मा याला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तिलकने 13 बॉलमध्ये 11 रन्स केल्या.

  • 04 May 2026 10:52 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : रोहित शर्मा आऊट, मुंबईला दुसरा झटका

    लखनौने मुंबईला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. सिद्धार्थने रोहित शर्मा याला कॅच आऊट केवं आहे.  रोहितने 44 बॉलमध्ये 84 रन्स केल्या.  सिद्धार्थने त्याच्या बॉलिंगवर रोहितला मोहम्मद शमी याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 04 May 2026 10:39 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट

    मोहसिन खान याने रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा ही सेट ओपनिंग जोडी फोडली आहे. मोहसिनने रायनला जोश इंग्लिस याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 32 बॉलमध्ये 82 धावांची जबरदस्त खेळी केली. रायनने या खेळीत 8 षटकार आणि  6 चौकार लगावले.

  • 04 May 2026 10:22 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : रायन रिकेल्टननंतर रोहितचं अर्धशतक, मुंबईचं शतक पूर्ण

    रायन रिकेल्ट याच्यानंतर रोहित शर्मा याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. रोहितने 27 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या आयपीएल करकीर्दीतील हे 49 वं अर्धशतक ठरलं. तसेच रोहितच्या अर्धशतकासह मुंबईच्या 100 धावाही पूर्ण झाल्या आहेत.

  • 04 May 2026 10:19 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : रायन रिकेल्टनचं अर्धशतक, मुंबईची जबरदस्त सुरुवात

    रायन रिकेल्टन याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 22 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रानयच्या आयपीएल कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं.

  • 04 May 2026 10:09 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : रोहितची फटकेबाजी, रायनची अप्रतिम साथ, मुंबईची जबरदस्त सुरुवात

    मुंबई इंडियन्सने 229 धावांचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली आहे. रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने  मुंबईला कडक सुरुवात मिळवून दिली आहे. मुंबईे पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 71 धावा केल्या आहेत. रोहित 36 आणि रायन 34 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 04 May 2026 09:58 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : मुंबई इंडियन्सची जबरदस्त सुरुवात, रोहित-रायन ओपनिंग जोडी सेट

    मुंबई इंडियन्सने लखनौ विरुद्ध 29 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने 4 ओव्हरमध्ये बिनबाद 44 धावा जोडल्या आहेत. रायन 31 आणि रोहित 12 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 04 May 2026 09:37 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : रोहित शर्मा – रिकल्टन जोडी मैदानात

    रोहित शर्मा आणि रियान रिकल्टन जोडी मैदानात उतरली आहे. लखनौने 229 धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पावरप्लेमध्येच आक्रमक खेळ अपेक्षित आहे.

  • 04 May 2026 09:22 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान, कोण बाजी मारणार?

    लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 गडी गमवून 228 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान गाठण्याची मोठी जबाबदारी आता फलंदाजावर आली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. अन्यथा 250 पार धावा असत्या.

  • 04 May 2026 09:06 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : लखनौचं द्विशतक पूर्ण, 20 ओव्हरमध्ये किती धावा करणार?

    लखनौने 200 धावा पूण केल्या आहेत. लखनौने 17 ओव्हरमध्ये 5 विके्टस गमावून 206 धावा केल्या आहेत. एडन मार्करम 27 आणि हिमंत सिंह 24 धावांवर नाबाद खेळत आहेत. आता लखनौ शेवटच्या 18 बॉलमध्ये किती धावा जोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 04 May 2026 08:40 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : लखनौचा अर्धा संघ माघारी, अक्षत रघुवंशी आऊट, रघु शर्माला पहिली विकेट

    फिरकीपटू रघु शर्मा याने लखनौचा डेब्यूटंट अक्षत रघुवंशी याला आऊट करत आयपीेएल कारकीर्दीतील पहिली विकेट मिळवली आहे. अक्षतने आपल्याच बॉलिंगवर अक्षतला 11 धावा केल्या.

  • 04 May 2026 08:34 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : लखनौला चौथा झटका, कॅप्टन ऋषभ पंत आऊट

    मुंबई इंडियन्सने लखनौला चौथा झटका दिला आहे.विल जॅक्स याने लखनौच्या डावातील 11 व्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली. विलने कॅप्टन ऋषभ पंत याला आऊट केलं. पंतने 10 बॉलमध्ये 15 रन्स केल्या.

  • 04 May 2026 08:23 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : कॉर्बिन बॉशकडून लखनौला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके, पूरननंतर मार्श आऊट

    मुंबईने जोरदार कमबॅख करत लखनौच्या सेट जोडीला एकचा ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. कॉर्बिन बॉश याने डावातील नवव्या ओव्हरमध्ये लखनौला 2 झटके दिले. कॉर्बिनने निकोलस पूरन याच्यानंतर मितेल मार्श या सेट जोडीला आऊट केलं.

  • 04 May 2026 08:16 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : पूरनच्या स्फोटक खेळीचा शेवट, लखनौला दुसरा झटका

    निकोलस पूरन याच्या स्फोटक खेळीचा शेवट झाला आहे. पूरनच्या रुपात लखनौने दुसरी विकेट गमावली आहे. कॉर्बिन बॉश याने पूरनला रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं.पूरनने  21 बॉलमध्ये 63 रन्स केल्या.

  • 04 May 2026 08:10 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : पूरनचा झंझावात, मुंबई विरुद्ध 16 बॉलमध्ये अर्धशतक

    निकोलस पूरन याने मुंबई विरुद्ध तडाखेदार बॅटिंग करत अर्धशतक झळकावलं आहे.  पूरनने त्याच्या डावातील 16 व्या बॉलवर षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं. याआधी पूरनचा 19 व्या मोसमातील 22 वा हायस्कोअर होता.

  • 04 May 2026 08:01 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : लखनौच्या नावावर पावरप्ले, पूरन-मार्शकडून पलटणच्या गोलंदाजांची धुलाई

    लखनौ सुपर जायंट्सने पावरप्ले आपल्या नावावर केला आहे. लखनौने मुंबई इंडियन्स विरुद्ध 6 ओव्हरमध्ये 1  विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. मिचेल मार्श 35 आणि पूरन 39 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 04 May 2026 07:43 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : लखनौला पहिला धक्का, जॉश इंग्लिस आऊट, अल्लाह गजनफरकडून शिकार

    मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पहिला धक्का दिला आहे. अल्लाह गजनफर याने जॉश इंग्लिस याला आऊट केलं आहे. इंग्लिस सूर्यकुमार यादव याच्या हाती 13 धावांवर कॅच आऊट झाला आहे.

  • 04 May 2026 07:31 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Score Updates : सामन्याला सुरुवात, लखनौची बॅटिंग, मिचेल मार्श-जॉश इंग्लिंस सलामी जोडी मैदानात

    मुंबई विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. लखनौकडून मिचेल मार्श आणि जॉश इंग्लिंस ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 04 May 2026 07:21 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि रघु शर्मा.

  • 04 May 2026 07:20 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन

    लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), जोश इंग्लिस, निकोलस पूरन, अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, आवेश खान आणि प्रिन्स यादव.

  • 04 May 2026 07:06 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, रोहितचं कमबॅक, सूर्या कॅप्टन

    मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यातून नियमित कर्णधार हार्दिक पंड्या बाहेर झाला आहे. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे. सूर्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा याचं कमबॅक झालं आहे.

  • 04 May 2026 07:02 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबईचा कॅप्टन बदलला

    लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईचा कर्णधार बदलला आहे. लखनौ विरुद्ध हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादव नेतृत्व करणार आहे.  हार्दिकला बरं वाटत नसल्याने तो खेळू शकत नसल्याचं कॅप्टन सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केलं आहे.

  • 04 May 2026 06:28 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : थोड्याच वेळात टॉस, कोण जिंकणार?

    मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. आता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 04 May 2026 06:21 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई आणि लखनौची 19 व्या मोसमातील कामगिरी

    मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांना 19 व्या मोसमात मुंबई आणि लखनौला काही खास करता आलं नाही. मुंबईने 9 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 8 पैकी 2 सामन्यांत विजयी होता आलं आहे. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या आणि लखनौ दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आता कोणता संघ तळाशी राहणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 04 May 2026 06:18 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : लखनौ सुपर जायंट्स टीम

    एडन मार्करम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मुकुल चौधरी, हिम्मत सिंग, जॉर्ज लिंडे, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, मोहसीन खान, अक्षत रघुवंशी, अब्दुल समद, आवेश खान, मणिमरन सिद्धार्थ, जोश इंग्लिस, ॲनरिक नॉर्खिया, मॅथ्यू ब्रिट्झके, अर्जुन तेंडुलकर, शाहबाज अहमद, आकाश महाराज सिंग, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी आणि नमन तिवारी.

  • 04 May 2026 06:16 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), रॉबिन मिंझ, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, रघु शर्मा, राज बावा, मयंक रावत, शार्दुल ठाकूर, अश्वनी कुमार, रोहित शर्मा, दीपक चहर, क्विंटन डी कॉक, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, दानिश मालेवार आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 04 May 2026 06:12 PM (IST)

    MI vs LSG IPL 2026 Live Updates : मुंबई विरुद्ध लखनौ आमनेसामने, कोण जिंकणार तिसरा सामना?

    मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स 19 व्या मोसमात तिसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. दोन्गही संघ 47 व्या सामन्यात आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून कोणता संघ 2 गुणांची कमाई करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून असणार आहे.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *