तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे आणि घणसोली पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे जलकुंभात तब्बल 5-6 महिने सडलेला मृतदेह आढळूनही जबाबदार कंत्राटदारावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली नाही. त्याचबरोबर, पंचवार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तुर्भे जलकुंभातील मृतदेह प्रकरण? दि. 27 एप्रिल 2021 रोजी तुर्भे…