
पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसादही उमटत असून कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडालेला आहे, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. अलीकडेच त्याच्या पत्नी आणि मुलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीने यावेळी सांगितले की, तो आहे त्या जागीच त्याला मारून टाका, ज्या लहानशा चिमुरडीसोबत हे घडलं ते अत्यंत हळहळणारं आहे. त्या बाळाचा जीव किती गुदमरला आसेल, लेकीचा आत्मा किती रडला आसेल. त्याला कोठरा शिक्षा करा अशी आरोपीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया आहे. हे बोलताना त्याची पत्नी ढळाढळ रडत होती.