Headlines

Russia-Iran : अमेरिका-इस्रायलचा गेम करण्यासाठी रशियाने खेळली खतरनाक चाल, ट्रम्पना जे वाटलं नाही ते काम पुतिन यांनी करुन टाकलं

Russia-Iran : अमेरिका-इस्रायलचा गेम करण्यासाठी रशियाने खेळली खतरनाक चाल, ट्रम्पना जे वाटलं नाही ते काम पुतिन यांनी करुन टाकलं
Russia-Iran : अमेरिका-इस्रायलचा गेम करण्यासाठी रशियाने खेळली खतरनाक चाल, ट्रम्पना जे वाटलं नाही ते काम पुतिन यांनी करुन टाकलं


अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्ध विराम आहे. अजूनही दोन्ही देशांमध्ये शांतता करार झालेला नाही. युद्ध विरामाच्या आडून दोन्ही देशांचे परस्परांवर हल्ले अजूनही सुरुच आहेत. या दरम्यान एक मोठी बातमी आहे. अमेरिका-इराण सीजफायरच्या काळात रशिया एक मोठा गेम करणार आहे. रशिया लवकरच इराणला 30 सुखोई Su-35 फायटर जेटने सुसज्ज करणार आहे. काही फायटर विमानांची डिलीवरी आधीच झाली आहे. काहींची बाकी आहे. रशियन कारखान्यांमध्ये वेगवान गतीने Su-35 फायटर जेट निर्मितीचं काम सुरु आहे. इराणकडे आधीच मिसाइल्स आहेत. आता Su-35 फायटर जेटमुळे त्यांची ताकद अधिक वाढेल. रशियाचं हे पाऊल अमेरिका आणि इस्रायलला अडचणीत आणणारं आहे. सुखोई Su-35 हे एक 4.5 जनरेशनच मल्टीरोल फायटर विमान आहे. एकाचवेळी अनेक कामं करण्याची या विमानाची क्षमता आहे.

2027 च्या सुरुवातीपर्यंत इराणसाठी जवळपास 30 Su-35 Flanker-E फायटर जेट तयार होतील अशी रशियाला अपेक्षा आहे. डिफेंस सिक्योरिटी एशियाने इराणी एअर फोर्सच्या जवळच्या सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या फायटर जेट्समुळे इराणची खोलवर हल्ला करण्याची तसच हेरगिरीची क्षमता खूप वाढेल. मार्च 2026 मध्ये 16 विमानं आधीच तयार होती. एप्रिल महिन्यात आणखी एक फायटर जेट तयार झालं. ऑपरेशनल दृष्टीने 17 फायटर जेट्सची एयरफ्रेम तयार आहे.

सुखोई Su-35 ची ताकद काय?

सुखोई Su-35 हे अत्याधुनिक, दोन इंजिन आणिचौथ्या पिढीचं एअर सुपीरियरिटी मल्टीरोल फायटर जेट आहे.

सुखोई डिजाइन ब्युरोने या विमानाची डिजाइन तयार केली आहे. कोम्सोमोलस्क-ऑन-अमूर एविएशन प्लांटमध्ये निर्माण कार्य सुरु आहे.

हे विमान 2,400 किमी/तास (जवळपास Mach 2.25) वेगाने उड्डाण करु शकतं.

एकदा या विमानात इंधन भरलं की ते 3600 किमीपर्यंत उड्डाण करु शकतं.

या विमानात शक्तीशाली इरबिस-ई (Irbis-E) रडार आहे. त्याद्वारे 400 किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य ट्रॅक करता येतं. विमानात हवेतून हवेत मारा करणारी मिसाइल्स , अँटी शिप आणि अँटी रेडिएशनन मिसाइल्स फिट करता येऊ शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *