Headlines

Vastushastra : देवघरात या चार गोष्टी असाव्यातच, घरात सदैव राहील सुख शांती, कधीच येणार नाहीत आर्थिक अडचणी

Vastushastra : देवघरात या चार गोष्टी असाव्यातच, घरात सदैव राहील सुख शांती, कधीच येणार नाहीत आर्थिक अडचणी
Vastushastra : देवघरात या चार गोष्टी असाव्यातच, घरात सदैव राहील सुख शांती, कधीच येणार नाहीत आर्थिक अडचणी


वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी

वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे तुमच्या घरातील ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. तुमच्या घरात असलेल्या देवघरातून सतत सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होत असते. या ऊर्जेचा तुमच्या आयुष्यावर खूपच शुभ प्रभाव पडतो.  जर तुमच्या घरात देवघर असेल तर घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि ऊर्जा संतुलन साधलं जातं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या देखील दूर होतात. देवघरामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. मात्र अनेकदा आपल्या काही चुकांमुळे अशा सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा देखील निर्माण होतो. तो कसा दूर करायचा आणि देवघरातून जी सकारात्मक ऊर्जा तयार होत असते, तिचा प्रभाव वाढवण्यासाठी काय करायचं? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या देवघरात असणं गरजेचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

शंख – देवघरामध्ये शंख असालाच पाहिजे असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शंखाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुमच्या देवघरात शंख असावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शंख ठेवताना एक काळजी घ्यावी ती म्हणजे शंखाचं तोंड नेहमी उत्तर दिशेला असावं, तसेच शंख कधीही खाली ठेवू नये, त्यासाठी स्टँड असावं.

घंटी- देवघरामध्ये घंटी असावी. देवपूजेवेळी घंटीचं विशेष महत्त्व आहे. देवघरात नेहमी घंटी आणि शंख असावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

लक्ष्मी मातेचा फोटो – तुमच्या देवघरात नेहमी लक्ष्मी मातेचा फोटो असावा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. लक्ष्मी मातेची नियमित पूजा करावी. यामुळे तुमच्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्यावर कधीही कोणतंही आर्थिक संकट येत नाही.

रंगनाथाची मूर्ती – घरामध्ये नेहमी रंगनाथाची मूर्ती असावी तसेच शिवलिंग देखील असावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *