Headlines

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा
केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, डीएत झाली इतकी वाढ, पगार किती वाढणार पाहा


DA Hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठा दिलासा देत महागाई भत्ता म्हणजे डीएत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही वाढ केवळ २ टक्के आहे. परंतू दीर्घकाळानंतर आलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा मानला जात आहे. गेल्या काही काळापासून कर्मचारी संघटना सतत सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल करण्याची मागणी करत होते. खास करुन आठव्या वेतन आयोगासंदर्भात आशा वाढल्या होत्या. त्याच दरम्यान आता डीए वाढीचा निर्णय आला आहे.

डिटेल्स टक्केवारी ( %)
आधीचा महागाई भत्ता 58%
वाढ +2%
नवा महागाई भत्ता 60 %

२% DA वाढीला मिळाली मंजूरी

केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात २ टक्के वाढीला मंजूरी दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थोडी वाढ होणार आहे. मात्र, ही वाढ मर्यादित मानली जात आहे. कारण कर्मचारी दीर्घकाळापासून जास्त वाढीची अपेक्षा बाळगून होते.

८ व्या वेतन आयोगाची मागणी

कर्मचारी संघटनांनी सरकारकडून वेतनाच्या ढाच्यात मोठ्या बदलाची मागणी केली आहे. त्यांनी फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर हा प्रस्ताव लागू झाला तर किमान वेतन १८ हजाराहून वाढून ६९,००० होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता म्हणजे डीएच्या घोषणेत यावेळी बराच उशीर झाल्याचे म्हटले जात आहे.
सर्वसाधारणपणे सरकार जानेवारी ते जूनच्या अवधीसाठी डीएचा निर्णय होळीच्या आसपास मार्चमध्ये करत असते. परंतू यावेळी असे झाले नाही. गेल्या १० वर्षात पहिल्यांदा डीएची घोषणा एप्रिलच्या महिन्यात करण्यात आली आहे. या आधी ऑक्टोबरमध्ये डीए ५५ टक्के वाढवून ५८ टक्के केला होता, जो एक जुलै २०२५ पासून लागू झाला होता.

बेसिक वेतन संभाव्य मासिक पगार वाढ
18,000 360
29,200 584
56,100 1,100+
2,50,000 5,000

किती वाढणार पगार ?

बेसिक पगाराच्या हिशेबाने महागाई भत्त्यातील वाढीचा परिणाम वेगवेगळ्या स्तरावर दिसणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन १८,००० रुपये आहे. त्याचा पगारात सुमारे ३६० रुपये प्रति महिना वाढ होईल.तर २९,२०० रुपये बेसिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्या सुमारे ५८४ रुपयांचा फायदा होईल. ५६,१०० रुपये बेसिक वेतन मिळणाऱ्यांच्या मासिक पगारात १,१०० रुपयांहून जास्त वाढ पाहायला मिळू शकतो. तर ज्यांचे बेसिक वेतन २,५०,००० रुपये आहे. त्यांच्या पगारात ५,००० रुपये महिना वाढू होऊ शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *