Headlines

जगात मोठी खळबळ! ज्याची भीती तेच घडतंय, इराणची अमेरिकेला मोठी धमकी, थेट म्हटले, अणुबॉम्ब..

जगात मोठी खळबळ! ज्याची भीती तेच घडतंय, इराणची अमेरिकेला मोठी धमकी, थेट म्हटले, अणुबॉम्ब..
जगात मोठी खळबळ! ज्याची भीती तेच घडतंय, इराणची अमेरिकेला मोठी धमकी, थेट म्हटले, अणुबॉम्ब..


इराण आणि अमेरिका युद्धाला 3 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. या युद्धाने जग जैरीस आले. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत. ऊर्जेचे एक संकट उभे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध थांबायला हवे, ही जगाची इच्छा असतानाच युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. इराण जवळ अमेरिकेने मोठी नाकेबंदी केली. इराणच्या बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाहीये. इराणला कच्चे तेल समुद्रात फेकून देण्याची वेळ येतंय. तेल रिफायनरी सुरू आहेत. मात्र, साठवणूक संपलीये. इराण जवळची नाकेबंदी काढण्याबाबत इराणने अमेरिकेला धमकी दिली. इराणच्या एका वरिष्ठ नेत्याने होर्मुजच्या सामुद्रधुनीबद्दल अमेरिकेला इशारा दिला आहे. हेट नाही तर त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, इराणसाठी होर्मुज खाडी अणुबॉम्बसारखी आहे.

इराणच्या संसदेचे उपसभापती अली निकझाद म्हणाले की, इराणसाठी अणुबॉम्ब होर्मुज खाडीच आहे. त्यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, होर्मुज खाडी आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग कधीही आता पूर्वीसारखा नसणार आहे. होर्मुजची सामुद्रधुनी हा इस्लामिक प्रजासत्ताकाचा अणुबॉम्ब आहे.

इराणने होर्मुज खाडीला थेट आपला अणुबॉम्बच म्हटले. होर्मुज खाडी आम्हाला आमच्या अणुबॉम्बपेक्षाही महत्वाची आहे. ती आमचा अणुबॉम्बच आहे. पुढे त्यांनी म्हटले की, अमेरिका त्यांच्या सैन्य शक्तीने कोणावरही काहीही थोपू शकते, हे आता संपले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेला काही गोष्टींचा स्वीकार करावा लागणार आहे आणि इराणच्या मागण्या मान्य कराव्या लागणार आहेत.

नाही तर त्यांची दादागिरी सुरूच राहिल. यासोबतच नुकताच अमेरिकेच्या लष्कराने होर्मुज खाडीजवळ इराणचे दोन ड्रोन पाडल्याचा दावा केला. मध्य पूर्वेत तणाव वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, हे ड्रोन होर्मुज खाडीजवळील अमेरिकेच्या जहाजांना धोका निर्माण करत असल्याने आम्ही दोन ड्रोन पाडली आहेत. इराणने यापूर्वीच इराण आणि कुवेत येथे ड्रोन हल्ला केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *