Headlines

100 पेक्षा जास्त मुला मुलींचा पार्टीत सहभाग, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी..

100 पेक्षा जास्त मुला मुलींचा पार्टीत सहभाग, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी..
100 पेक्षा जास्त मुला मुलींचा पार्टीत सहभाग, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा खुलासा, पोलिसांनी..


पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीतील एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली. ज्यावेळी गुन्हे शाखेकडून हा छापा टाकण्यात आला, त्यावेळी तिथे 100 च्या जवळपास मुले मुली उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे सर्व मुले मुली नशेत होते. काही अल्पवयीन मुले देखील तिथे उपस्थित होते. दारूचा मोठा साठा देखील होता. पोलिसांकडून ज्यावेळी ही कारवाई करण्यात आला, त्यावेळी सर्व मुले मुली फुल नशेत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या पार्टीचे आयोजन केलेल्याची चाैकशी केली जात आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा मुद्दा तूफान चर्चेत आहे. घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे विविध पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. रेव्ह पार्टीच्या ठिकाणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

या रेव्ह पार्टीबद्दल तेजस्विनी सातपुते अप्पर पोलीस आयुक्त पुणे यांनी मोठी माहिती दिली. अप्पर पोलीस आयुक्त  तेजस्विनी सातपुते यांनी म्हटले की, लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुळापूर परिसरात मध्यरात्री पार्टी सुरू होती आणि यासाठी कोणतीही परवानगी न घेता ही पार्टी सुरू होती. यावेळी 100 पेक्षा जास्त मुले आणि मुली उपस्थित होते.

त्याच्याकडे राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून दुपारी एक वाजल्यापासून ते रात्रीसाडे अकरापर्यंत परवानगी होती. मात्र, त्यानंतर सुद्धा त्यांनी पार्टी सुरू ठेवली. यामध्ये अनेक तरुण 21 वर्षाच्या आतील असल्याची संभावना वाटत आहे. ज्यांनी हा बंगाल उपस्थित करून दिला त्याचा यामध्ये काही संबंध आहे का? याबाबत पडताळणी करत आहोत.

आयोजकांनी यामध्ये कोणता भंग केला. लाखो रुपयांचे मद्य येथे आढळून आले आहेत. यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. येथे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा आढळून आला आहे. येथील पार्टीसाठी असलेले तरुण हे कोणत्या भागातून आले याचा तपास सुरू आहे. पार्टीत सहभागी झालेल्या मुला मुलींची कसून चाैकशी पोलिसांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *