Headlines

पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह…

पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह…
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह…


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ९ खासदारांपैकी ६ खासदार बंडखोरी करण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच एक मोठी घडामोड घडली. बंडखोरी करणाऱ्या या खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला आहे. या निकालामुळे मोठा ट्विस्ट आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, शिंदे गटात जाण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोर्टातील निकालाचा आणि माझ्या बंडखोरीच्या निर्णयाचा काहीच संबंध नाही.

यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, या निकालाची अपेक्षा नव्हती, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुढे शिंदे म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच मीदेखील थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे अत्यंत गाजलेलं आणि थरकाप उडवणारं हत्याकांड होतं. यामध्ये न्याय मिळायलाच हवा होता.

तब्बल दोन दशकानंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आज कोर्टाने दिला आहे. सबळ पुराव्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. माफीचा साक्षीदार विश्वासू नसल्याने त्याच्या जबाबाच्या आधारावर आम्हाला आरोपींना शिक्षा देता येत नाही, असं कोर्टाने म्हटलं. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय समीकरणे फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *