Headlines

पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार

पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार
पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार


पुण्यात वाढत्या गुन्हेगाराची घटनानंतर आता रात्री दहा वाजल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यांवरी फेरीवाले आणि खाऊ गल्ल्यांना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. पुण्यात २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये गुन्हेगारी कमी झाली आहे. फायरिंगच्या घटना पूर्ववैमनस्यातून झाल्या आहेत. डायल १११ वर ३५ हजार फोन आले असून पुणे पोलिस फोन आल्यानंतर ७ मिनिटात घटनास्थळी पोहचतात. पुणे पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असल्याचेही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे. २६ मेपासून पुढचे १४ दिवस पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आम्ही शहरातील हॉटेल, रेस्टॉरंटना रात्री १० वाजता बंद करणार आहोत. मोठी हॉटेल रेस्टॉरंट रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, हॉकर्स, फुटपाथवरील खाऊ गल्ली असेल त्यांना हे नियम पाळावे लागतील. शनिवार (दि. २३) रात्रीपासून हा आदेश जारी करण्यात आला आहे. १० वाजता सर्व फेरीवाल्यांना व्यवहार बंद करण्यास सांगण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. अलीकडे शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

बालाजीनगर परिसरात गर्दीच्या ठिकाणी पाच जणांनी एका हॉटेलबाहेर रिक्षाचालकावर गोळीबार करून त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती.ही हल्ल्याची घटना शहरातील गुंड सूर्यकांत आंदेकर यांच्या सांगण्यावरून घडवून आणण्यात आली होती.अलीकडे घडलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही उपाययोजना असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढली हे खोटं आहे. खोटं नेरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरु आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पुण्यात गुन्हेगारी कमी झाली असल्याचे पोलिस आयुक्यांनी म्हटले आहे. पुणे शहरात १ लाख लोकसंख्येच्या मागे गुन्हेगारीचं प्रमाण अतिशय कमी आहे.पुण्यातील गुन्हे नियंत्रणात आहे, १०० च्या वर आरोपी आत आहेत. आता जी गोळीबाराची घटना ही पूर्व वैमनस्यातून झाली होती. पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले आहेत असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.

९९ टक्के मुली प्रेमसंबंधातून पळून गेल्याचे प्रकार समोर येते. १ टक्के प्रकरणात रिल्स बघून आम्हाला मोठे व्हायचे आहे असे सांगून घर सोडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. २४ तासात त्या मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. ४९ मुलींच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ३८ मुली सापडल्या आहेत असेही ते म्हणाले.

पुण्यात जमावबंदीचे आदेश

पुण्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. २६ मेपासून पुढचे १४ दिवस पुण्यात जमावबंदी लागू असणार आहे. सध्या इंधन तुटवड्यामुळे पुणे शहरात विविध राजकीय आणि सामाजिक संघटना निषेध मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.त्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू केल्याचे बोलले जात होते. मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी ही नियमित प्रक्रिया असल्याचे म्हणत हा आरोप फेटाळून लावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *