Headlines

यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!

यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!


देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.  भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मान्सूनची पुढील वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र हवामानातील बदल आणि समुद्रातील परिस्थितीमुळे त्याच्या आगमनात थोडा विलंब झाला. हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल होत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तळकोकण आणि गोवा भागात पुढील 48 ते 72 तासांत मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर हळूहळू राज्यातील इतर जिल्ह्यांतही पावसाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *