Headlines

शत्रूही करणार नाही असे काम पाकिस्तानने केले, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट होर्मुज..

शत्रूही करणार नाही असे काम पाकिस्तानने केले, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट होर्मुज..
शत्रूही करणार नाही असे काम पाकिस्तानने केले, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट होर्मुज..


इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. पण पाकिस्तानच्या मध्यस्थीला यश मिळत नाहीये. इराण आणि अमेरिकेत सध्या युद्धसंधी आहे. डोनाल्ड ट्रम्प कुठे ना कुठे इराणसोबतच्या युद्धात एकटे पडल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान त्यांनी अनेक देशांकडे मदत मागितली पण एकही देश त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. हे युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, अशी जगाची इच्छा आहे. अनेकांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीवर नाराजी व्यक्त केली. इराणने संशय व्यक्त केलाच आहे. होर्मुज खाडीत तणाव आहे. अमेरिकेची नाकेबंदी आहे. डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचे काैतुक करताना दिसले. पाकिस्तान इराणविरोधात अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

मोठा गेम पाकिस्तानने केला. पाकिस्तानने इराणला जाणाऱ्या मालासाठी असा कायदेशीर मार्ग तयार केला आहे, ज्यानंतर होर्मुज खाडीत अमेरिकेची नाकेबंदी राहूच शकत नाही. पाकिस्तानच्या प्रदेशातून मालाच्या वाहतुकीचा आदेश 2026 नुसार विहित केलेले व्यापारी मार्ग उघडण्यात आले आहेत. पाकिस्ताने मध्यस्थी करण्यात स्वत: चाही मोठा फायदा केला.

इराणलाही हा थेट फायदाच होणार. पाकिस्तानने अमेरिका धोका दिला. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने शनिवारी ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी अंतर्गत 14 नवीन व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध लादले. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तानची लुडबुड राहिली आहे. दोन्ही देशांमध्ये बैठक घडवून पाकिस्तानने आणली. मात्र, असे असले तरीही त्यांना यश मिळत नाहीये. दुसरी बैठकही पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती.

इराणने एकाच टेबलवर बसून अमेरिकेसोबत चर्चा करण्यास नकार दिला. परिणामी दुसरी बैठक रद्द झाली. तीन दिवसात निर्णय इराणला घ्यावाच लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. इराणच्या तेल रिफायनरीच्या पाईपलाईन फुटण्याची शक्यता आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने पाईपलाईनवरील लोड वाढला आहे. याबद्दलच बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. जर इराण या युद्धात मध्यस्थी करू शकला नाही तर रशिया किंवा इतर देश मध्यस्थीकरिता पुढे येऊ शकतो. जे पाकिस्तानसाठी धक्का असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *