
विधानपरिषदेवर कोणत्या पक्षातून कोण जाईल या चर्चांनी सध्या राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कोणाला विधानपरिषदेवर पाठलं जाईल याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
विधानपरिषदेवर जाण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये उमेश पाटील, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार या प्रमुख इच्छुकांची नावे समोर आली आहेत. तर आता याच संदर्भात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलवली जात आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आता या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.