Headlines

dhurandhar 2 : सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाचे तिकीट मिळेनात, अखेर या अभिनेत्याची घेतली मदत

dhurandhar 2 : सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाचे तिकीट मिळेनात, अखेर या अभिनेत्याची घेतली मदत
dhurandhar 2 : सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाचे तिकीट मिळेनात, अखेर या अभिनेत्याची घेतली मदत


इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2026 चा सीजन सुरु व्हायला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. पण त्याआधी देशात सध्या दोनच विषयांची सर्वात जास्त चर्चा आहे. एक म्हणजे इराण युद्ध आणि दुसरा धुरंधर द रिव्हेज सिनेमा. आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरात सर्वांना वेड लावलय. मागच्या आठवड्यात देशभरात प्रदर्शित झालेला धुरंधर द रिव्हेज हा दुसरा भाग आहे. हा स्पाय एक्शन पॅक्ड सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. अवघ्या पाच दिवसात या चित्रपटाने जवळपास 500 कोटी कमाईचा आकडा पार केला आहे. सगळ्याच थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो हाऊस फुल्ल जात आहेत. तिकीटं मिळवण्यासाठी भरपूर मारामार सुरु आहे.

अगदी देशातल्या एका दिग्गज क्रिकेटपटूला सुद्धा हाच अनुभव आलाय. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना सुद्धा धुरंधर 2 सिनेमाची तिकीट मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. धुरंधर सिनेमाच्या दोन्ही पार्टमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राकेश बेदी यांनी इन्स्टाग्राम व्हिडिओमधून हा किस्सा सांगितला. स्पॉयलर्स शेअर करु नका अशी त्यांनी फॅन्सना विनंती केली. सुनील गावस्कर यांच्यासोबत झालेल्या भेटीचा किस्सा त्यांनी शेअर केला.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

“काल, मी भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांना भेटलो. ते मला म्हणाले, राकेशजी मला धुरंधर 2 तिकीट्स मिळत नाहीय, प्लीज काहीतरी व्यवस्था करुन द्या” असं राकेश बेदी व्हिडिओमध्ये म्हणाले. “मी त्यांच्यासाठी काही तिकिट्सची व्यवस्था करतोय. अपेक्षा आहे की, मला शक्य होईल” असं राकेश बेदी म्हणाले.

कुठल्या क्रिकेटर्सनी हा सिनेमा पाहिलाय?

धुरंधर 2 हा बॉलिवूडमधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरु शकतो. हा रेकॉर्ड धुरंधरच्या पहिल्या पार्टच्या नावावर आहे. या चित्रपटाने जवळपास 1300 कोटींची कमाई केली होती. हा रेकॉर्ड धुरंधर द रिव्हेजचं मोडेल. या सिनेमाने सगळ्यांच वेड लावलय. अलीकडचे गुजरात टायटन्स टीमचे खेळाडू या सिनेमाचा शो पाहण्यासाठी अहमदाबादच्या थिएटरमध्ये गेले होते. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या सुद्धा मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचा आनंद घेताना दिसला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *