
रामदेव बाबाImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
TV9 Satta Sammelan 2026: TV9 भारतवर्ष आयोजित सत्ता संमेलनात रामदेव बाबा यांनी सहभाग घेतला आणि विविध मुद्दावर मनमोकळी उत्तरं दिली. याचेवळी त्यांना गरब्यात मुस्लिमांना एंट्री का नाही? सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणास मनाई का? असे प्रश्न विचारण्यात आले. अशी चर्चा फूट पाडणारी असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांनी मक्का आणि मदिना येथे प्रवेश करण्यास बंदी का आहे असा सवाल करत त्यांनी याचे उत्तर देता येईल का असे म्हटले. व्हाट इंडिया थिंक्स टुडे WITT या कार्यक्रमात बाबा रामेदव यांनी सार्वजनिक रित्या द्वेष पसरवू नये असे आवाहन केले.
आपले मनच मंदिर
आपल्याला मक्का आणि मदिना येथे जाऊन काय करायचे आहे. “तेरे पूजन को भगवान बना मन मंदिर आलीशान”, असे सांगत, आपल्यातच देव आहे असे ते म्हणाले. आपल्याला मक्का-मदिना, व्हॅटकिन सिटीला जाण्याची गरज नाही. सध्याची अविचारी उदारता अत्यंत धोकादायक आहे. मशिदीत कोणी ऊँ नमःशिवाय, गायत्री मंत्र अथवा महामृत्यूंजय मंत्राचा जप ऐकला आहे का? तुम्ही यासाठी मंदिरातच प्रार्थना करायला लावणार आहात, त्यांना आपापल्या मेळाव्यात आनंद घेऊ द्या. प्रत्येक व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत आनंदात आहे. कोणी कुणाच्या घरात घुसेल तर ते ठीक आहे का? मंदिर-मशिदी खूप सजवा. पण सार्वजनिक रित्या द्वेष पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले.
स्वामी रामदेव म्हणाले की जे लोक द्वेष पसरवतात. तेच लोक बंधुभावाचा नारा देतात. आणि इतरांना असहाय्य आणि हतबल समजतात. हीच मोठी गडबड आहे. जे लोक जाणूनबुजून द्वेष पसरवतात, ते आपले इप्सित साध्य करण्यासाठी हिंसाचाराला चिथावणी देतात आणि मग औदार्याबद्दल बोलतात, या दुप्पटीपणावर त्यांनी टिका केली.
UGC मुद्दावर काय दिलं उत्तर?
UGC मुद्दावर रामदेव बाबा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, UGC नियमावलीसंदर्भात सुरु असलेल्या वादावर त्यांनी उत्तर दिले. जो कोणी युजीसीच्या बाजूने आणि विरोधात बोलेल, लोक त्याचे ऐकतील. मला त्याची चिंता नाही असे रामदेव बाबा म्हणाले. जाती, समुदायाच्या नावावर कोणताही कायदा होऊ नये असे ते म्हणाले. कोणीच कुणाला त्रास देऊ नये, माझे इतकेच म्हणणे आहे, असे रामदेव बाबा म्हणाले.
ब्राह्मणांविषयी काय म्हणाले बाबा रामदेव?
ब्राह्मणांविषयी सुरू असलेल्या वादावर त्यांनी मन मोकळं केलं. ब्राह्मण ही काही जाती नाही. ज्यांचा मेंदू तल्लख असतो, त्यांना ब्राह्मण म्हणतात. त्यांचे मोठे योगदान आहे.प्रत्येक जातीचे आणि समुदायाचे वेगवेगळे काम आहे. मी बुद्धीने ब्राह्मण आहे. शक्तीने क्षत्रिय आहे. मी महादलित आहे कारण मी सर्वांची सेवा करतो. प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान, आदर करावा. कोणी पंडित म्हणून जन्माला येत नाही. तर्काने समजून घेतल्यास कोणताही भेद दिसून येत नाही, असे रामदेव बाबा म्हणाले.