Headlines

‘तिकीट खूप महाग आहे’, ‘धुरंधर 2’ मधील या कलाकाराकडे नाहीत चित्रपट पाहण्यासाठी पैसे, कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी

‘तिकीट खूप महाग आहे’, ‘धुरंधर 2’ मधील या कलाकाराकडे नाहीत चित्रपट पाहण्यासाठी पैसे, कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी
‘तिकीट खूप महाग आहे’, ‘धुरंधर 2’ मधील या कलाकाराकडे नाहीत चित्रपट पाहण्यासाठी पैसे, कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी


दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘धुरंधर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास घडवत आहे. रणवीर सिंह, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या दिग्गज कलाकार असणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. जागतिक स्तरावरही या चित्रपटाने 750 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठं यश मिळवलं आहे.

मात्र, या चमकदार यशामागे एक अशी हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये एका ऑटो रिक्षा चालकाची छोटीशी भूमिका साकारणाऱ्या एका कलाकाराचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शेवटचा सीन

एका पत्रकाराने त्या कलाकाराला विचारले की त्यांनी स्वतःचा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला का? यावर त्याने दिलेलं उत्तर अत्यंत भावनिक होतं. तो म्हणाला, ‘साहेब, सध्या चित्रपट नवीन आहे आणि तिकीट 500 रुपयांचं आहे. माझी एवढी ऐपत नाही की मी 500 रुपये खर्च करून माझाच चित्रपट पाहू शकतो. त्यामुळे अजून थिएटरमध्ये जाऊ शकलो नाही.’

ही केवळ एका तिकिटाची गोष्ट नाही तर त्यामागे दडलेला संघर्ष अधिक मोठा होता. जेव्हा त्याच्या मुलांच्या हट्टाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्या वडिलांची व्यथा स्पष्टपणे जाणवली. त्याने सांगितलं की, त्याची मुलं वडिलांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण वास्तव खूप कठीण आहे.

या गोष्टीत धुरंधर ठरला अपयशी

भावुक होत त्याने सांगितलं, ‘मुलं म्हणत होती की चित्रपट पाहायला जाऊया पण आमच्या कुटुंबात पाच जण आहेत. पाच जणांची तिकिटं 2500 रुपयांची येतात. हे 2500 रुपये म्हणजे आमच्या संपूर्ण महिन्याची बचत आहे. त्यामुळे मी मुलांना समजावलं की थोडं थांबा, गर्दी कमी झाली आणि तिकिटांचे दर कमी झाले की आपण सगळे एकत्र जाऊ.’

एकीकडे ‘धुरंधर 2’ हा चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहे तर दुसरीकडे त्याच चित्रपटाचा एक भाग असलेल्या या कलाकारासाठी 500 रुपयांचं तिकीटही मोठं ओझं ठरत आहे. ही घटना चित्रपटसृष्टीतील वास्तव अधोरेखित करते. जिथे मोठ्या कलाकारांचे कोट्यवधींचे मानधन असते पण छोट्या कलाकारांचा संघर्ष मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे ‘धुरंधर’चा विजय तेव्हाच होईल जेव्हा या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला तो अभिमानाने मोठ्या पडद्यावर पाहता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *