Headlines

अखेर इराणने ते पाऊल उचललंच, होर्मुझच्या मार्गाबद्दल घेतला सर्वात मोठा निर्णय; आता जगाचं टेन्शन मिटलं!

अखेर इराणने ते पाऊल उचललंच, होर्मुझच्या मार्गाबद्दल घेतला सर्वात मोठा निर्णय; आता जगाचं टेन्शन मिटलं!
अखेर इराणने ते पाऊल उचललंच, होर्मुझच्या मार्गाबद्दल घेतला सर्वात मोठा निर्णय; आता जगाचं टेन्शन मिटलं!


Strait Of Hormuz : पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. या निर्णयानंतर इराणच्या परवानगीशिवाय या मार्गावरून एकही तेलवाहू तसेच इतर व्यापारी जहाज जाऊ शकत नाहीये. इराणने या मार्गावर आपले लष्कर तैनात केले आहे. त्यामुळेच भारतासह जगातील इतरही देशांत कच्च्या तेलाचा, नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळेच हा सागरी मार्ग बंद करण्यात आल्याने हा मार्ग पुर्ववत करावा अशी मागणी जागतिक पातळीवरुन केली जात होती. अमेरिकेकडूनही वेगवेगळ्या माध्यमातून इराणवर दबाव टाकण्यात येत होता. दरम्यान, आता याच होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इराणने या सागरी मार्गाबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व काय?

जागतिक व्यापारासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खूप महत्त्वाची आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी साधारण 20 टक्के तेलाचा व्यापार याच मार्गाने होते. भारत आपल्या गरजेपैकी साधारण 40 ते 50 टक्के कच्चे तेल याच मार्गाने मगावतो. त्यामुळे इराणने हा मार्ग बंद केल्याने भारताला अन्य देशांकडून कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायू मागवावा लागतोय. पाकिस्तान, चीन युरोपीय देशांचीही अशीच स्थिती झाली आहे. जगातील प्रत्येक 5 व्यापारी जहाजांपैकी एक जहाज हे याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. त्यामुळेच हा मार्ग जागतिक व्यापारच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.

आता इराणने नेमका काय निर्णय घेतला आहे?

जगापुढे उर्जानिर्मितीचे संकट निर्माण झाल्यानंतर अमेरिकेकडून इराणवर दबाव टाकला जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी न केल्यास आम्ही बळाचा वापर करू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवले आहे. इराण मात्र माघार घेण्यास तयार नाही. असे असतानाच आता मात्र इराणने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या जहाजांना इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास मुभा दिली आहे. परंतु प्रत्येक जहाजाला अगोदर इराणकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या जहाजांना इराणने घालून दिलेले सर्व नियमही पाळावे लागतील, अशी भूमिका इराणने घेतली आहेय. इराणच्या या भूमिकेचे आता जागतिक पातळीवर स्वागत केले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *