
Meesho Share Jumps: ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी मीशोने बाजारात धडाका केला आहे. दिग्गज कंपन्यांना मागे टाकत या कंपनीच्या शेअरने एकाच दिवसात 14 टक्क्यांची उसळी घेतली आहे. शेअरमध्ये मोठी तेजी दिसली आहे. 9 एप्रिल रोजी या शेअरने बाजारात कमाल दाखवली.
या आठवड्याच्या गुरुवारच्या व्यापारी सत्रात ट्रेडिंग सुरू होण्याच्या 90 मिनिटातच जवळपास 3.4 कोटी शेअर्सची खरेदी आणि विक्री झाली. सामान्यपेक्षा आज कित्येक पटीने आज ट्रेडिंग झाली. सामान्यपणे 26 लाख शेअर्सचे मूल्य समोर येते. त्यात उलथापालथ होते.
मीशोचा शेअर त्याच्या इश्यू प्राईस 111 रुपयांपेक्षा जवळपास 55 टक्क्यांनी अधिक ट्रेड करत आहे. बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून कंपनीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. डिसेंबर 2025 रोजी कंपनीने बाजारात प्रवेश केला. पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर 53 टक्क्यांनी उसळला होता.
मीशो लिमिटेडच्या शेअरमध्ये आज दमदार तेजी दिसली. कंपनीचा शेअर 8.46 टक्क्यांनी उसळून 165.64 रुपयांवर पोहचला. दिवसभर या स्टॉकमध्ये खरेदीचे सत्र दिसून आले. त्यामुळे या कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास असल्याचे समोर आले.
अनेक गुंतवणूक संस्था हा शेअर खरेदीसाठी अनुकूल कौल देत आहेत. तर काही संस्थांनी वेट अँड वॉचचा पवित्रा घेतला आहे. तर काहींनी हा शेअर विक्री न करण्याचा आणि त्यातील गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. येत्या काही या शेअरचा चढउतार समोर येईल.
स्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.