Headlines

साधी वेशभूषा, खासगी वाहनातून प्रवास अन् दोन दिवस… असा रचला सापळा; निदा खान प्रकरणाचा घटनाक्रम आला समोर

साधी वेशभूषा, खासगी वाहनातून प्रवास अन् दोन दिवस… असा रचला सापळा; निदा खान प्रकरणाचा घटनाक्रम आला समोर
साधी वेशभूषा, खासगी वाहनातून प्रवास अन् दोन दिवस… असा रचला सापळा; निदा खान प्रकरणाचा घटनाक्रम आला समोर


टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. 25 दिवसानंतर निदा खानला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. निदाला येत्या सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. निदा गर्भवती असल्याने तिच्या आईला तिला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. निदा खानला पकडण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती. अत्यंत शिताफिने पोलिसांनी तिला पकडलं. तिला पकडल्यानंतर दंगल होऊ नये म्हणून पोलिसांनी दंगल विरोधी पथकही तैनात ठेवलं होतं. विशेष म्हणजे ज्याने निदाला लपण्यासाठी मदत केली त्याचीच मदत घेऊन पोलिसांनी हे मिशन फत्ते केलं. काल रात्रीपासून सकाळपर्यंत नेमकं काय काय घडलं? त्याचाच घटनाक्रम समोर आला आहे.

नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी तयार केली होती. मागील पाच दिवसापासून मुख्य आरोपी निदा खान, तिचे आई-वडील, मावशी आणि भावासह छत्रपती संभाजी नगरातील नारेगाव येथील कमी वस्ती असेल्याला कौसर पार्कमध्ये राहत होती. पोलिसांनी निदा खानला अटक करताना तिला राहण्यासाठी मदत करणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याची मदत घेऊन सापळा रचला.

रात्रीच मिळवला ट्रान्झिस्ट रिमांड

तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास निदा खानला केली अटक. तिला अटक करताना पोलिसांनी पाळली प्रचंड गुप्तता पाळली होती. साधी वेशभूषा आणि खाजगी वाहनातून येऊन पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून तिचा ट्रांजिट रिमांड मिळवला. घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकही तयार ठेवले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी सर्व तयारी केली होती.

दोन दिवस थांबले…

अटकेनंतर निदा खानला छत्रपती संभाजीनगरवरून नाशिकला नेतांना पोलिसांनी गाडी बदलली होती. हा सुद्धा पोलिसांच्या प्लानिंगचा एक भाग असल्याचं समोर आलं आहे. हिनावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त चार दिवसापासून संपर्कात होते. तर मागील दोन दिवसापासून नाशिक पोलिसांची टीम नारेगावात दबा धरून बसली होती.

पोलिसांना शंका काय?

नाशिक न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर हिना खान छत्रपती संभाजीनगरमध्ये कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील डेटा आणि चॅटच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास केला. नाशिक टीसीएस प्रकरणातील आणखी काही आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची पोलिसांना शंका आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *