Headlines

42 व्या वर्षी झाली आई, दान केलं 60 लीटर ब्रेस्ट मिल्क, कारण ऐकून तुम्ही म्हणाल…

42 व्या वर्षी झाली आई, दान केलं 60 लीटर ब्रेस्ट मिल्क, कारण ऐकून तुम्ही म्हणाल…
42 व्या वर्षी झाली आई, दान केलं 60 लीटर ब्रेस्ट मिल्क, कारण ऐकून तुम्ही म्हणाल…


भारतीय बॅडमिंटन विश्वातील माजी स्टार खेळाडू ज्वाला गुट्टा या नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक जाणीवांमुळे चर्चेत असतात. देशासाठी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्वाला यांनी आता एक अत्यंत संवेदनशील आणि मानवतेचा संदेश देणारे कार्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवजात बाळांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी तब्बल 60 लिटर स्तनदूध दान करून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

ज्वाला गुट्टा यावर्षी एप्रिल महिन्यात आई बनल्या असून त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचे नाव ‘मीरा’ असे ठेवण्यात आले आहे. आई झाल्यानंतर मातृत्वाचा आनंद अनुभवत असतानाच त्यांनी अनेक गरजू नवजात बालकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारी रुग्णालयात सुरू असलेल्या स्तनदूध दान उपक्रमात सहभागी होत त्यांनी मोठ्या प्रमाणात दूध दान केले.

का दान केलं 60 लीटर स्तनदूध?

सध्या सोशल मीडियावर ज्वाला यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या छायाचित्रात दानासाठी जमा केलेल्या दूधाच्या पिशव्या दिसत असून ज्वाला अत्यंत आनंदी आणि समाधानात दिसत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

अनेक वेळा अकाली जन्मलेली किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली नवजात बाळे रुग्णालयात दाखल असतात. अशा बाळांना त्यांच्या आईचे दूध मिळणे शक्य होत नाही. मात्र नवजात शिशूंसाठी आईचे दूध अत्यंत आवश्यक मानले जाते, कारण त्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यांचे जीवन वाचण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत दान केलेले स्तनदूध अनेक बाळांसाठी जीवनदायी ठरते.

सोशल मीडियावर होतंय प्रचंड कौतुक

याच सामाजिक जाणीवेतून ज्वाला गुट्टा यांनी तब्बल 60 लिटर ब्रेस्ट मिल्क जमा करून दान केले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक नवजात बालकांना नवजीवन मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ज्वाला यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘आईचे दूध जीव वाचवते.

अकाली जन्मलेल्या आणि आजारी बाळांसाठी दान केलेले दूध जीवन बदलणारे ठरू शकते. जर तुम्ही दूध दान करण्यास सक्षम असाल तर एखाद्या गरजू कुटुंबासाठी तुम्ही हिरो ठरू शकता.’ त्यांच्या या संदेशानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. आता प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी हा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *