Headlines

प्रेम, खेळणं अन् भयानक ट्विस्ट..; 8.2 रेटिंगचा खतरनाक चित्रपट ओटीटीवर, डोकं चक्रावून सोडणारा अनकट व्हर्जन

प्रेम, खेळणं अन् भयानक ट्विस्ट..; 8.2 रेटिंगचा खतरनाक चित्रपट ओटीटीवर, डोकं चक्रावून सोडणारा अनकट व्हर्जन
प्रेम, खेळणं अन् भयानक ट्विस्ट..; 8.2 रेटिंगचा खतरनाक चित्रपट ओटीटीवर, डोकं चक्रावून सोडणारा अनकट व्हर्जन


नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाची भारतात खूप चर्चा होत आहे. अत्यंत कमी बजेट असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे एका 26 वर्षांच्या युट्यूबरने हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ऑब्सेशन’. आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. त्यामुळे जर थिएटरमध्ये तुम्हाला हा चित्रपट पाहता आला नसेल, तर घरबसल्या किंवा मोबाइलवर तुम्ही तो पाहू शकता. ‘ऑब्सेशन’ हा या वर्षातील सर्वाधिक रेटिंग मिळालेला हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहा पैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. परदेशात या चित्रपटाची छप्परफाड कमाई तर होतच आहे, पण भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.

भारतात ‘ऑब्सेशन’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास दोन कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र या चित्रपटातील महत्त्वाच्या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवल्याने काही भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली होती. आता ओटीटीवर त्यांना अनकट व्हर्जन पाहता येणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील ज्या 38 सेकंदांच्या दृश्यावर कात्री चालवली होती, तो सीन आता प्रेक्षकांना ओटीटीवर पहायला मिळणार आहे. त्यामुळे ओटीटी व्हर्जन अधिक थरारपूर्ण असेल, यात काही शंका नाही.

पहा ट्रेलर-

‘लेट्स सिनेमा’ने दिलेल्या माहितीनुसार, मायकल जॉनस्टन आणि इंटे नवरेट यांचा हा हॉरर थ्रिलर चित्रपट आजपासून (2 जून 2026) ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. थिएट्रिकल रिलीजदरम्यान या चित्रपटाला आधी ‘पिकॉक’ या प्लॅटफॉर्मवरून काढण्यात येईल आणि त्यानंतर तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल.

चित्रपटाची कथा

ही एका अशा इच्छेची कहाणी आहे जी आधी वेड बनते आणि नंतर शाप. यामध्ये बेअर नावाच्या तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे, जो त्याची सहकारी निक्कीच्या प्रेमात पडतो. मांजरीच्या मृत्यूनंतर बेअरला एक रहस्यमयी वस्तू मिळते, जी त्याची एक इच्छा पूर्ण करते. निक्कीने त्याच्या प्रेमात आकंठ बुडावं, अशी इच्छा तो मागतो. त्याची ही इच्छा तर पूर्ण होते, मात्र नंतर हीच इच्छा त्याच्या गळ्याभोवती फास बनते आणि अत्यंत भयानक वळण घेते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *