Headlines

Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
Mansoon Update | राज्यात मान्सूनची दमदार एंट्री!; या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढली असून, काही भागांसाठी विशेष हवामान इशारेही जारी करण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाटेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे ठाणे, मुंबई, नाशिक, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका अद्यापही कायम असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एकीकडे मान्सूनचे आगमन आणि दुसरीकडे उष्णतेचा प्रभाव अशा दुहेरी परिस्थितीमुळे नागरिकांनी हवामानाच्या ताज्या अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *