याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच… अकोल्यात घडलं असं काही की…
अकोल्यात अन्न व औषध विभागाच्या कारवाईचा मोठा धसका दुकानदारांनी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तुकाराम मुंढे यांच्या पथकाकडून शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू असतानाच अकोला ते अकोट रस्त्यावरील पळसोद फाट्याजवळ हजारो पेप्सी म्हणजेच कुल्पी प्रकार रस्त्यालगत फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात दुकानदारांनी…