Rohit Pawar : शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती, अन्यथा..कर्जमाफी योजनेवरुन रोहित पवारांचा इशारा
शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे खरंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वाद वाढत चालला आहे. याचं मुख्य कारण आहे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाहीय. महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी जवळपास 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण या योजनेत काही…