ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले…
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमूल कांग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पक्षात हाहाकार उडालेला आहेय शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या आमदार आणि खासदाराच्या बैठकीला केवळ आठ आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याने पक्षात गोंधळ उडाला आहे. गेल्या वेळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ २० आमदार पोहचले होते. या वेळी आकडा आणखीनच कमी झाला…