सोन्याचा चमचा, भरलेलं ताट, सभागृहात ठाकरे-शिंदेंची जुगलबंदी; प्रवीण दरेकरांची एकनाथ शिंदेंसाठी बॅटिंग
मुंबई : राज्याच्या विधानपरिषद सभागृहात विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांच्या निरोप समारंभाचे भाषण होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केल्यानंतर शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अंबादास दानवेंमधील कार्यकर्त्याचा गुण सांगितला. मात्र, या भाषणांवेळी शिंदे आणि ठाकरेंमधील जुगलबंदी पाहायला मिळाली. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाषण करताना नाव न…