दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या, तिसरीला शरीर थकलं अन् अचानक… पुण्यात पोलीस भरतीवेळी नेमकं काय घडलं?
पोलिसांची वर्दी परिधान करुन आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (२३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस कवायत मैदानावर ही ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे….