स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
Asha Bhosle Passes Away : ज्येष्ठ गायिका स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन झाल्या आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मुंबईच्या महापौर रितू…