Headlines

MI vs RCB : कॅप्टन हार्दिकला मोठा झटका, एक चूक महागात, झटक्यात लाखोंचा दंड, कारण?

MI vs RCB : कॅप्टन हार्दिकला मोठा झटका, एक चूक महागात, झटक्यात लाखोंचा दंड, कारण?
MI vs RCB : कॅप्टन हार्दिकला मोठा झटका, एक चूक महागात, झटक्यात लाखोंचा दंड, कारण?


मुंबई इंडियन्सला रविवारी 12 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 20 व्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईचा 22 धावांनी धुव्वा उडवत एकूण तिसरा विजय मिळवला. तर मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. घरच्या मैदानातील पराभव असल्याने मुंबईसाठी ही लाजीरवाणी बाब ठरली. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याला मोठा झटका लागला आहे. बीसीसीआयने कॅप्टन हार्दिकवर कारवाई केली आहे. ओव्हर रेट कायम न राखल्याने हार्दिकला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे हार्दिकवर स्लो ओव्हर रेट राखल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हार्दिकला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवामुळे कॅप्टन म्हणून हार्दिकवर आधीच नेटकऱ्यांनी आणि क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. हार्दिकने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात लोकल बॉय आणि अनुभवी गोलंदाज शार्दुल ठाकुर याला 10 ओव्हरनंतर बॉलिंगची संधी दिली. शार्दूलने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवून दिली. त्यामुळे हार्दिकने शार्दूलला विलंबाने ओव्हर दिल्याने मुंबईला कसा फटका बसला हे स्पष्ट झालं. हार्दिकवर त्याच्या रणनितीमुळे टीका झाली. त्यानंतर बीसीसीआयनेही स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला दणका दिला.

नक्की काय झालं?

नियमानुसार, ठराविक वेळेत 20 ओव्हरचा खेळ होणं बंधनकारक असतं. निर्धारित वेळेत 20 ओव्हरचा खेळ न झाल्यास संघाच्या चुकीसाठी कर्णधाराला जबाबदार ठरवलं जातं. त्यामुळे हार्दिकवर ही कारवाई करण्यात आली. रविवारी मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्याचा निकाल लागण्यासाठी प्रचंड वेळ लागला. त्यामुळे चाहत्यांचाही वेळ वाया गेला.

हार्दिककडून कोणत्या नियमाचं उल्लंघन?

हार्दिककडून आरसीबी विरूद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटचं उल्लंघन झालं. त्यामुळे हार्दिकवर आयपीएलच्या आचार संहितेच्या कलम 2.22 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्लो ओव्हर रेटसाठी कलम 2.22 मध्ये कारवाईची तरतूद आहे. तसेच हार्दिकची 19 व्या मोसमात स्लो ओव्हर रेट संदर्भातील ही पहिलीच चूक आहे. त्यामुळेच हार्दिकला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हार्दिक पंड्या याच्याकडून पुन्हा अशीच चूक झाल्यास दंडाच्या रक्कमेतही वाढ होईल.

हार्दिकवर कारवाईचा चाबूक

मुंबईचा पाचवा सामना केव्हा?

दरम्यान मुंबईने या 19 व्या मोसमात आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. मुंबईला या 4 पैकी 3 सामने गमवावे लागले आहेत. आता मुंबई आपल्या मोहिमेतील पाचवा सामना हा 16 एप्रिलला खेळणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *