Gadchiroli LPG Crisis | गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील बिकट परिस्थिती समोर!
एलपीजी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहातील मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे 150 मुलींसाठी दररोज जेवण तयार केले जाते, मात्र गॅस उपलब्ध नसल्याने स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. या अडचणीत भर म्हणजे लाकडाचीही कमतरता भासत असून, चुलीसाठी आवश्यक इंधन मिळवणे कठीण झाले…