Headlines

Chanakya Niti : विवाहित पुरुषांनो सावधान, आपलं हे गुपीत आयुष्यात कोणाला कधीच सांगू नका, संसार उद्ध्वस्त होईल

Chanakya Niti : विवाहित पुरुषांनो सावधान, आपलं हे गुपीत आयुष्यात कोणाला कधीच सांगू नका, संसार उद्ध्वस्त होईल
Chanakya Niti : विवाहित पुरुषांनो सावधान, आपलं हे गुपीत आयुष्यात कोणाला कधीच सांगू नका, संसार उद्ध्वस्त होईल


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये विवाहित पुरुषांना उपदेश करताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात तुम्ही जर या गोष्टींचं पालन केलं तर आयुष्यात यशस्वी व्हाल, तुम्ही एक चांगले पती, एक चांगले वडील ठराल. एवढंच नाही तर जग देखील तुमचं कौतुक करेल तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. परंतु तुम्ही जर चुकलात तर तुमचा संसार देखील उद्ध्वस्त होऊ शकतो, असा इशाराही चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या विवाहित पुरुषांनी कोणालाही सांगू नये, यातील काही गोष्टी तर अगदी आपल्या बायकोला देखील सांगता कामा नये. जर तुम्ही या गोष्टी इतरांना सांगितल्या तर तुमचं आयुष्य बरबाद होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमंक काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

तुम्ही किती कमवता – चाणक्य म्हणतात तुम्ही किती कमवता, तुमचा पगार किती ही गोष्टी तुम्ही चुकनही कोणालाही सांगू नका. ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवा. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर खूप जास्त कमवत असाल तर लोक तुमचा हेवा करतील, त्यातूनच तुम्हाला नवे शत्रू निर्माण होऊ शकतात. असे लोक कायम तुमच्या वाईटावर टपलेले असतील, आणि समजा तुम्ही जर कमी कमवत असाल तर लोक तुम्हाला समाजात मान देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही किती कमवता? हा विषय तुमच्यापुरताच मर्यादित असू द्या, याबद्दल कधीही कोणालाही सांगू नका.

प्रेम संबंध – चाणक्य म्हणतात तुम्ही विवाहित आहात आणि लग्नापूर्वी तुमचे एखाद्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, मात्र आता लग्नानंतर तुम्ही तुमच्या बायकोसोबत प्रामाणिक आहात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या जुण्या प्रेमसंबंधांबाबत बायकोला देखील सांगू नका. यामुळे तिच्या मनात कायम तुमच्याबद्दल संशय निर्माण होईल. लग्नानंतर तुम्ही देखील तुमचा भूतकाळ विसरून जा, त्याची कोणासोबतचही चर्चा करू नका, यातच तुमचं भलं आहे.

योजना – चाणक्य म्हणतात तुम्ही जर भविष्याच्या दृष्टीकोणातून एखादी नवी योजना बनवत असाल तर ती नेहमी गुप्त ठेवा. ती कोणालाही सांगू नका. कारण या समाजात असे देखील लोक आहेत, जे तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *