Headlines

IPL 2026 : मुंबईला झटका, रोहितला दुखापत असताना पलटणचा खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट

IPL 2026 : मुंबईला झटका, रोहितला दुखापत असताना पलटणचा खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट
IPL 2026 : मुंबईला झटका, रोहितला दुखापत असताना पलटणचा खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट


मुंबई इंडियन्स गुरुवारी 16 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आपला पाचवा सामना खेळणार आहे. मुंबईसमोर वानखेडे स्टेडियममध्ये अजिंक्य असलेल्या पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. पंजाबने आतापर्यंत या मोसमातील  4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवला. पंजाबच्या खात्यात 6 गुण आहेत. तर पंजाबच्या तुलनेत मुंबईची उलट स्थिती आहे. मुंबईने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. तर फक्त एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे मुंबईसमोर पंजाबला रोखून घरच्या मैदानात एकूण दुसरा विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. मात्र त्याआधी मुंबई टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

अथर्व अंकोलेकर IPL 2026 मधून आऊट

मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला दुखापतीमुळे आरसीबी विरूद्धच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं होतं. रोहितला या दुखापतीमुळे पंजाब विरुद्ध खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मुंबई आधीच अडचणीत होती. आता त्यात आणखी भर पडली आहे. पलटणचा ऑलराउंडर अर्थव अंकोलेकर याला एकही सामना न खेळता संपूर्ण 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागलं आहे. आयपीएलकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अर्थव देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचंच प्रतिनिधित्व करतो. अर्थव मुंबई क्रिकेट वर्तुळात ‘बंड्या’ म्हणून ओळखला जातो.

अर्थवला अजून आयपीएल स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे यंदा अर्थवचं पदार्पण होईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र पुन्हा एकदा अर्थवच्या पदरी निराशा आली आहे. अर्थवला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये मोजून आपल्यात घेतलं होतं.

अर्थवची उल्लेखनीय कामगिरी

टीम इंडियाने 2020 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. अर्थव त्या वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता. अथर्वने त्याआधी 2019 साली अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. अर्थवला त्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

मुंबईला मोठा धक्का, लोकल बॉय आऊट

अथर्वच्या जागी कुणाचा समावेश?

दरम्यान अर्थवच्या जागी मुंबई इंडियन्स टीमने बदली खेळाडूचं नाव जाहीर केलं आहे. पलटणकडून टीममध्ये कृष भगत याचा समावेश करण्यात आला आहे. कृषला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर घेण्यात आलं आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *