Headlines

ODI Tri-Series: टीम इंडियाचं कर्णधारपद तिलक वर्माच्या गळ्यात, श्रीलंका दौऱ्यासाठी घोषणा

ODI Tri-Series: टीम इंडियाचं कर्णधारपद तिलक वर्माच्या गळ्यात, श्रीलंका दौऱ्यासाठी घोषणा
ODI Tri-Series: टीम इंडियाचं कर्णधारपद तिलक वर्माच्या गळ्यात, श्रीलंका दौऱ्यासाठी घोषणा


ODI Tri-Series: टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार वैभव सूर्यवंशी. तिलक वर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळImage Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेच भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय दौरे सुरू होणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. असं असताना भारत अ संघ आयपीएल स्पर्धेनंतर श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे ट्राय सीरिज खेळणार आहे. यात श्रीलंका अ, भारत अ आणि अफगाणिस्तान अ संघ खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा खेळाडूंना स्थान दिलं आहे. भारतीय सिनियर संघाचं भविष्य पाहून या संघात खेळाडूंची निवड केली आहे. आगामी वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने या खेळाडूंची एका अर्थाने चाचपणी केली जाणार आहे. या संघात आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीचं नावही आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तिलक वर्माकडे कर्णधारपद

वनडे ट्राय सीरिजसाठी तिलक वर्माकडे भारत अ संघाची धुरा सोपवली आहे. तर रियान पराग हा उपकर्णधार असणार आहे. प्रियांश आर्य, आयुष बडोनी आणि प्रभसिमरन सिंग यांचीही संघात निवड झाली आहे. यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अर्शद खान यांसारख्या युवा गोलंदाजांनाही या मालिकेत मोठी संधी मिळणार आहे. मालिकेनंतर भारत अ आणि श्रीलंका अ संघात दोन मल्टी डे कसोटी सामने होणार आहेत. या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा नंतर केली जाणार आहे. पण सध्या वनडे संघाची घोषणा केली आहे. ही मालिका 9 जूनपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 21 जूनला होणार आहे. या मालिकेत तिन्ही संघ एकमेकांशी दोनदा भिडणार आहेत. त्याने टॉपला असलेल्या दोन संघांचा अंतिम फेरीत सामना होईल.

भारत ‘अ’ संघ

तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विप्रज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंह, अंशुल कंबोज, अरशद खान.

ट्राय सीरिज मालिकेसाठी वेळापत्रक

  • 9 जून: भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
  • 11 जून: भारत ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
  • 13 जून: अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
  • 15 जून: भारत ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
  • 17 जून: भारत ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’
  • 19 जून: अफगाणिस्तान ‘अ’ विरुद्ध श्रीलंका ‘अ’
  • 21 जून: अंतिम सामना





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *