‘लग्न न करताही मुलं होतात’, 37 वर्षीय अभिनेत्रीच्या विधानाने खळबळ, वैयक्तिक आयुष्यावर केलं मोठं विधान
चित्रपटसृष्टीत अनेक सेलिब्रिटी असे आहेत, जे पारंपरिक लग्नाच्या चौकटीबाहेर जाऊन सिंगल पालक होण्याचा निर्णय घेतात. करण जौहर, तुषार कपूर आणि एकता कपूर यांसारख्या अनेकांनी लग्न न करता पालकत्व स्वीकारलं आहे. आता या चर्चेत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन हिने अलीकडेच सिंगल मदर होण्याबाबत आपले विचार…