Dosa Death Case : डोसे खाल्ल्यामुळे दोन बहिणींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आई-वडिल ICU मध्ये
मागच्या आठवड्यात डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस मुलींचा मृत्यू झाला. आई-वडिलांची प्रकृती गंभीर असून ते रुग्णालयात असल्याची बातमी आली होती. गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा भागात ही घटना घडली होती. डेअरीवरुन खीरू आणलं. डोसा बनवताना ते खीरु वापरलं. या खीरुमुळे कुटुंबाची प्रकृती बिघडली असं संशय मुलीच्या आजोबांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी डेअरीवरुन ते खीरु तपासणीसाठी जप्त केलं होतं….