लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर नवरा आणि नवरीच्या नावासमोर जन्मतारीख लिहिणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही त्याच प्रकरणी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे विवाहासाठी मुलगा आणि मुलगी कायदेशीर वयाचे आहेत की नाही, हे सहज समजू शकणार आहे….