
अनेकांना कैरी आवडतेच. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, के, सी आणि बी 6 मोठ्या प्रमाणात असतात. तसेच, त्यामध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त हे घटकही भरपूर प्रमाणात असतात.
तज्ञांच्या सांगण्यानुसार, कैरीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असेत. कैरीचे सेव केल्यास बद्धकोष्ठता टाळता येते.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, लोह आणि व्हिटॅमिन ई यांसारखी पोषक तत्वं कैरीमध्ये असतात, ही तत्वं आपल्या केसांचं आणि त्वचेचं पोषण करतात. व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस मदत करते, तर लोह आणि झिंकमुळे आपले केस खूप मजबूत होतात.
कैरी खाणं फायदेशीर असतं. कैरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, फायबर आणि पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयाचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
कैरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेत अचानक वाढ होत नाही. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते मधुमेही रुग्णांसाठीही उपयुक्त आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)