Headlines

TVK Vijay : थलपती विजय यांना मुलाने दिला झटका? टीव्हीकेच्या ऐतिहासिक विजयानंतर थेट..

TVK Vijay : थलपती विजय यांना मुलाने दिला झटका? टीव्हीकेच्या ऐतिहासिक विजयानंतर थेट..
TVK Vijay : थलपती विजय यांना मुलाने दिला झटका? टीव्हीकेच्या ऐतिहासिक विजयानंतर थेट..


थलपती विजय आणि त्यांचा मुलगा जेसन संजयImage Credit source: Instagram

अभिनेता थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. एकीकडे टीव्हीकेच्या अभूतपूर्व कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं असताना दुसरीकडे विजय यांचं खासगी आयुष्यसुद्धा चर्चेत आलं आहे. थलपती विजय हे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज होत असतानाच त्यांच्या मुलाने त्यांना झटका दिल्याचं म्हटलं जात आहे. विजय यांचा मुलगा जेसन संजयने त्यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समजतंय. यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. परंतु जेसनने याआधी विजय यांना फॉलो केलं होतं की नाही, हे मात्र स्पष्ट नाही. विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगम यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यापासूनच जेसन त्यांच्यापासून दुरावला गेल्याचं समजतंय.

जेसन संजय हा विजय आणि संगीता यांचा मोठा मुलगा आहे. तो सहसा प्रकाशझोतात नसतो. तरी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्याला पाहिलं गेलं आहे. गेल्या काही काळापासून तो चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास करत आहे. विजय यांनी 1999 मध्ये संगीता यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना एक जेसन हा मुलगा आणि दिव्या साशा ही मुलगी आहे. जेसन लवकरच दिग्दर्शक म्हणून तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचीही चर्चा आहे. त्याने कॅनडामधील टोरंटो इथं दिग्दर्शनाचं आणि लंडनमध्ये पटकथालेखनाचं प्रशिक्षण घेतलं आहे. जेसनने लहानपणी वडिलांच्या चित्रपटांमध्येही छोट्या भूमिका साकारल्या आहेत.

विजय आणि संगीता यांची पहिली भेट एका चित्रपटाशी संबंधित कार्यक्रमात झाली होती. संगीता विजय यांची खूप मोठी चाहती होती. आता लग्नाच्या वीस वर्षांनंतर संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. फेब्रुवारी 2026 पासून विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे संगीताने या अर्जात विजय यांच्यावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता. यानंतर त्रिशा कृष्णनसोबत त्यांचं नाव जोडलं जाऊ लागलं. या चर्चांदरम्यान विजय आणि त्रिशा यांनी एका लग्नसोहळ्याला एकत्र हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते.

विजय आणि त्रिशा यांनी जवळपास पंधरा वर्षांनंतर ‘लियो’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्रिशा तिच्या सोशल मीडियावर विजय यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते. इतकंच नव्हे तर टीव्हीकेच्या विजयानंतर त्रिशा विजय यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *