Headlines

Vaibhav Sooryavanshi: एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्र

Vaibhav Sooryavanshi: एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्र
Vaibhav Sooryavanshi: एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्र


एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला चॅलेंज, आव्हान पेलण्यासाठी कोचचे 2 गुरूमंत्रImage Credit source: PTI

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने चमकदार कामगिरी केली आहे. त्याची फलंदाजी पाहून अनेक जण त्याचे चाहते झाले आहेत. असं असताना त्याच्याबाबत एबी डिव्हिलियर्सने केलेलं विधान चर्चेचा विषय ठरला आहे. एबी डिव्हिलियर्सने वैभव सूर्यवंशीबाबत काय सांगितलं? याची उत्सुकता अनेकांना आहे. टी20 क्रिकेटमध्ये छाप पाडलेल्या वैभव सूर्यवंशीासाठी हे विधान म्हणजे चॅलेंज आहे. एबी डिव्हिलियर्सने वैभव सूर्यवंशीसमोर टी20 सारखं कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याचं आव्हान ठेवलं आहे. एबी डिव्हिलियर्सने वैभव सूर्यवंशीसमोर आव्हान ठेवताच टीव्ही 9 ने लगेचच त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा यांच्याशी चर्चा केली. मनीष ओझा यांच्या मते, वैभव सूर्यवंशी एबी डिव्हिलियर्सने ठेवलेलं आव्हान पेलू शकतो. पण यासाठी त्याला दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल.

स्टूअर्ट ब्रॉडच्या पॉडकास्ट For The Love Of Cricket वर बोलताना एबी डिव्हिलियर्सने सांगितलं की, या वयात वैभव सूर्यवंशीची क्षमता कमालीची आहे. पण खरं आव्हान टी20 नाही तर कसोटी क्रिकेट आहे. मी त्याला क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला कळेल की खरं आव्हान काय असतं. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूची मानसिक आणि शारीरिक स्थितीची पारख होते. एबी डिव्हिलियर्सच्या विधानानंतर वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांना नेमकं काय वाटतं? याबाबत जाणून घेण्याचा टीव्ही 9 ने प्रयत्न केला. यासाठी मनीष ओझा यांच्याशी संपर्क साधला.

मनीष ओझा यांनी सांगितलं की, टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी कसोटी क्रिकेट खेळू शकतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहेत. तो रेड बॉल क्रिकेटमध्ये कसं खेळतो हे पाहिलं आहे. बिहारसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मोठी खेळी केली आहे. मनीष ओझा यांच्या मते एबी डिव्हिलियर्सचं कसोटी खेळण्याचं आव्हान पेलण्यास वैभव सूर्यवंशी सक्षम आहे. पण यासाठी त्यांनी वैभव सूर्यवंशीला दोन सल्ले दिले आहेत.

मनीष ओझा म्हणाले की, पहिलं म्हणजे त्याला चेंडू सोडण्याची कला आणखी प्रगल्भ करावी लागेल आणि दुसरं म्हणजे फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावं लागले. दोन्ही क्षमता त्यात आता नाहीत असं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेड बॉल क्रिकेट खेळताना त्याने चेंडू सोडून मोठी खेळी केली आहे. पण त्याला त्याच्या ताकदीवर आणखी थोडं काम करणं गरजेचं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *