Headlines

Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनते समोर नतमस्तक… शपथविधी सोहळ्यातील हा व्हिडीओ चर्चेत

Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनते समोर नतमस्तक… शपथविधी सोहळ्यातील हा व्हिडीओ चर्चेत
Video | पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनते समोर नतमस्तक… शपथविधी सोहळ्यातील हा व्हिडीओ चर्चेत


पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीची विशेष चर्चा रंगली. कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर झालेल्या या भव्य कार्यक्रमात विविध राज्यांतील राजकीय नेते सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुडघ्यावर बसून जनतेला नमस्कार केला. यावेळी जनतेच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह खूप मोठा होता.

सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे, या कार्यक्रामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातील राजकारणातही या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर हा शपथविधी सोहळा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *