
उन्हाळ्यात अनेकदा साप लोकांच्या घराच्या आसपास आढळतात. काहीवेळा साप घरात देखील प्रवेश करत असतात. यासाठी तुम्ही करत असलेल्या चुका कारणीभूत आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही विशिष्ट परिस्थिती आणि वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतातच, पण प्रतिकात्मक आणि प्रत्यक्ष स्वरूपात सापांचे वास्तव्य किंवा नागदोष निर्माण होण्याचे कारणही ठरू शकतात. जर तुम्हीही खालील चुका करत असाल, तर सावध व्हा. कारण हे वास्तुदोष तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. यामुळे सापही घराकडे आकर्षित होऊ शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साप घराकडे का आकर्षित होतात?
- उंदरांचे वास्तव्य आणि घाण : घरात जुने सामान किंवा कचरा साचलेला असेल तर तिथे उंदीर आपले घर बनवतात. वास्तुशास्त्रानुसार घाण ही राहूचे प्रतीक मानली जाते. उंदरांच्या मागोमाग त्यांचे मोठे शिकारी असलेले सापही घराकडे आकर्षित होतात.
- घरातील कोळ्याचे जाळे : वास्तुशास्त्रात कोळ्याची जाळी नकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. जसे साप अंधाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जागेत लपायला पसंत करतात, तसेच जाळी तुमच्या आयुष्यात गोंधळ आणि मानसिक तणाव निर्माण करतात. यामुळे तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यात अडथळे येतात आणि घरात नकारात्मकता वाढते.
- ओलसर आणि अंधारे कोपरे : वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा (ईशान कोन) पवित्र आणि मोकळी ठेवावी असे सांगितले जाते. जर या भागात ओलसरपणा, कचरा असेल, तर ते वास्तुपुरुषाच्या मस्तकावर भार मानले जाते. तसेच थंड आणि अंधाऱ्या जागा सापांसाठी सुरक्षित ठिकाण बनतात, ज्यामुळे घरात सर्पदोष आणि कलह निर्माण होऊ शकतो.
- चिंच आणि कापसाच्या झाडांचा प्रभाव : वास्तुशास्त्रानुसार घराच्या परिसरात चिंचेचे किंवा कापसाचे झाड लावणे अशुभ मानले जाते. जुन्या मान्यतेनुसार अशा दाट आणि नकारात्मक ऊर्जा असलेल्या जागांमध्ये सापांचे वास्तव्य वाढण्याची शक्यता अधिक असते.
- ब्रह्मस्थानात जड सजावट : घराचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान हा आकाश तत्त्वाशी संबंधित मानला जातो. उन्हाळ्यात हा भाग मोकळा आणि थंड ठेवला नाही, तर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो. ऊर्जा स्थिर झाल्याने घरात उकाडा आणि जडपणा निर्माण होतो, जो विषारी जीवांसाठी अनुकूल वातावरण ठरू शकतो.
सापापासून बचावासाठी काय करावे?
- स्वच्छता ठेवा : कोळ्याची जाळी, उंदरांची बिळे आणि जुना कचरा तात्काळ हटवा. त्यामुळे राहूचे नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते.
- सर्पगंधा आणि तुळस लावा : घरात तुळस आणि सर्पगंधा लावणे शुभ मानले जाते. ही झाडे केवळ हवा शुद्ध करत नाहीत, तर वास्तुनुसार नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकता वाढवण्यास मदत करतात.