Headlines

मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, तेलाच्या बाबतीत रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते..

मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, तेलाच्या बाबतीत रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते..
मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, तेलाच्या बाबतीत रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते..


मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठ्या प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक देशांमध्ये तेल संकटाची छाया अधिक गडद होत चालली आहे. या संकट काळात ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख देश रशियाने मोठ पाऊल उचललं आहे. एक एप्रिल पासून रशिया पेट्रोल निर्यात पूर्णपणे बंद करणार आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने हे वृत्त दिलं आहे. रशियन सरकारने पेट्रोलियम निर्यात बंद करण्याच्या निर्णयाची पृष्टी केली आहे. रशियाचे उप पंतप्रधान अलेक्जेंडर नोवाक यांनी शुक्रवारी ऊर्जा मंत्रालयाला विशेष निर्देश दिले. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, 1 एप्रिलपासून पेट्रोल निर्यातीवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रस्ताव तयार करा. रशियन वृत्तसंस्था तास नुसार हे प्रतिबंध फक्त काही आठवड्यांसाठी नाही, तर पुढचे चार महिने 31 जुलैपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे.

या इतक्या मोठ्या निर्णयामागे अनेक आंतरराष्ट्रीय आणि भू-राजकीय कारणं आहेत. “मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण केली आहे. यामुळे किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहेत” असं रशियन उप पंतप्रधान नोवाक म्हणाले. परदेशी बाजारात रशियन ऊर्जा उत्पादनांना मोठी मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी ही सकारात्मक गोष्ट असल्याचं त्यांनी मान्य केलं.

रशियाने असा निर्णय का घेतला?

हे प्रतिबंध समजून घेण्यासाठी आपल्याला मागच्यावर्षीच्या घटनाक्रमावर नजर टाकावी लागेल. मागच्यावर्षी रशिया आणि रशियाचं नियंत्रण असलेल्या यु्क्रेनच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती. युक्रेनने रशियन तेल रिफायनरीजवर हल्ले वाढवलेले तेव्हाचा हा काळ होता. एका खास ऋतुत रशियात देशांतर्गत इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. रिफायनरीजला असलेला धोका आणि देशांतर्गत अचानक वाढलेली मागणी याने रशियन प्रशासनाला सर्तक केलं आहे. काहीही झालं तरी देशांतर्गत पुरवठा बाधित होणार नाही, हे रशियन सरकारचा पहिलं उद्दिष्टय आहे.

असा कठोर निर्णय घेण्याची ही पहिली वेळ नाहीय

रशियाने आपल्या तेल निर्यातीबाबत इतका कठोर निर्णय घेण्याची ही पहिली वेळ नाहीय. देशातील वाढत्या इंधन किंमतींवर लगाम लावण्यासाठी आणि इंधन तुटवड्याचा सामना करावा लागू नये यासाठी रशियन सरकारने आधीच पेट्रोल-डिझेलच्या निर्यातीवर प्रतिबंध घातले आहेत. आकड्यांवर नजर टाकल्यास रशियाने मागच्यावर्षी जवळपास 50 लाख मेट्रिक टन पेट्रोल निर्यात केली. रोजच्या हिशोबाने बघायचं झाल्यास हा आकडा जवळपास 1,17,000 बॅरल प्रतिदिन होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारातील निर्यात थांबवून देशांतर्गत बाजारपेठ सुरक्षित करणं याचा अर्थ स्थानिक महागाई नियंत्रणात ठेवण हा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *