Headlines

तारीख ठरली, इराणमध्ये भयंकर घडणार? आतापर्यंत जे कधीच झालं नाही…, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ

तारीख ठरली, इराणमध्ये भयंकर घडणार? आतापर्यंत जे कधीच झालं नाही…, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ
तारीख ठरली, इराणमध्ये भयंकर घडणार? आतापर्यंत जे कधीच झालं नाही…, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ


इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ला केला त्यास महिना उलटून गेला आहे. आता युद्ध पाचव्या आठवड्यात पोहचले आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला होता. तेव्हा पासून हे युद्ध धगधगत आहे. इराणने यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करुन अमेरिकेला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र जगाचे २० टक्के इंधन या मार्गातून जात असले तरी अमेरिका याबाबती स्वयंपूर्ण असल्याने अमेरिकेला काही फरक पडला नाही. आता युद्ध आणखीन पेटले आहे. अमेरिकेने त्यांच्या दोघा पायलटना रेस्क्यू ऑपरेशन करुन इराणमधून वाचवले आहे.

दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला १० दिवसांचा अल्टीमेटम देखील समाप्त होत आहे. पुढील दहा दिवसात जर होर्मुझ उघडली नाही तर इराणवर इतके हल्ले केले जातील की तो अश्म युगात पोहचेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. आता पुन्हा ट्रम्प यांनी इराणच्या पॉवर प्लांट आणि अन्य इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. मंगळवारी आता इराणवर मोठा हल्ला करण्याची थेट पोस्टच समाजमाध्यमावर ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर केली आहे.

ट्रम्प यांनी त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. जिच्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.त्यांनी म्हटले आहे की मंगळवारी इराणमध्ये ‘पॉवर प्लांट डे’ आणि ‘ब्रिज डे’ असेल. म्हणजे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की इराणच्या वीज केंद्रांवर आणि पुलांवर हल्ले होतील. नंतर त्यांनी शिव्यांची लाखोली वाहात लिहीलंय की होर्मुझ उघडा, अन्यथा जहन्नुममध्ये राहाल. केवळ पाहात राहा. आणखी पुढे लिहिलंय की अल्लाची प्रशंसा करा.’

ही पोस्ट यासाठी धक्कादायक आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी खुलेआम शिव्या देत कोणा देशाला धमकावले आहे. हे शिष्टाचार आणि मुत्सदीच्या साऱ्या मर्यादा ओलांडणारे वक्तव्य आहे.

पॉवर प्लांट आणि पुलांवर हल्ला का ?

जर कोणा देशाच्या वीज केंद्रांवर हल्ले केले तर संपूर्ण देश अंधारात बुडतो. हॉस्पिटल, पाणी, जेवण बनणे बंद होते. पुल तुटले तर संपूर्ण चलनवलन यंत्रणा ठप्प होणार, हा थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरच हल्ला आहे.

ट्रम्प यांना दाखवायचे आहे की जर इराणने होर्मुझ उघडली नाही तर इराणला ते कोणत्या पातळीपर्यंत नुकसान पोहचवू शकतात, तेथील सर्वसामान्य जनतेचे रोजचे व्यवहारही ठप्प होतील.

येथे पोस्ट पाहा –

ही धमकी किती गंभीर?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वार आणि तारीख सांगितली आहे, मंगळवार, टार्गेटही सांगितले आहे की वीज केंद्र आणि पुल. आणि भाषा देखील सांगते की ते आता थांबणार नाहीत.

इराणसाठी हा निर्णयाचा क्षण आहे. एक तर होर्मुझ उघडायची किंवा हल्ले झेलायचे. परंतू इराणही झुकणार नाही असे वाटत आहे. त्यांनी आधीच सांगितले आहे की होर्मुझ त्यांची ताकद आहे.आणि ते याचा शस्रासारखा वापर करत राहणार आहेत. जगाच्या नजरा आता मंगळवारावर टीकल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *