Headlines

एका चित्रपटासाठी 250 कोटी मानधन, विजय थलपतीची एकूण संपत्ती किती? ऐकून बसेल धक्का

एका चित्रपटासाठी 250 कोटी मानधन, विजय थलपतीची एकूण संपत्ती किती? ऐकून बसेल धक्का
एका चित्रपटासाठी 250 कोटी मानधन, विजय थलपतीची एकूण संपत्ती किती? ऐकून बसेल धक्का


Tamil Nadu Assembly election results 2026: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा विजयने आता राजकारणात दमदार एंट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या ‘टीव्हीके’ या पक्षामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काही एक्झिट पोल्सनुसार, त्याच्या पक्षाला 98 ते 120 जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर हे खरे ठरले तर चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेला विजय राजकारणातही मोठा नेता म्हणून उदयास येऊ शकतो.

थलपती विजयने लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. 1984 मध्ये ‘वेत्री’ या तमिळ चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या दिग्दर्शनाखाली अनेक चित्रपटांत काम केले. 1992 मध्ये ‘नलैय्या तिरुपू’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.

यानंतर त्याने पूवे उनाक्कागा (1996), लव टुडे (1997), कधालुक्कु मरियाधई (1997), थुल्लाथा मनामुम थुल्लुम (1999), कुशी (2000), प्रियामानवले (2000) आणि फ्रेंड्स (2001) यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. 2003 मधील ‘Thirumalai’ आणि 2004 मधील ‘Ghilli’ या चित्रपटांनी त्याच्या करिअरला मोठी व्यावसायिक उंची मिळवून दिली.

राजकारणात दमदार एन्ट्री

चित्रपटसृष्टीत यश मिळवल्यानंतर विजयने आता राजकारणात प्रवेश केला आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्याच्या पक्षाने थेट सत्ताधारी एम. के. स्टालिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम पक्षाला जोरदार टक्कर दिल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार, विजयचा हा राजकीय डेब्यू ‘ब्लॉकबस्टर’ ठरू शकतो अशी चर्चा रंगली आहे.

निवडणूक हलफनाम्यानुसार, विजयने 69 चित्रपटांमध्ये काम करत मोठी संपत्ती कमावली आहे. त्याची एकूण मालमत्ता सुमारे 603.20 कोटी रुपये आहे तर बँक खात्यांमध्ये सुमारे 213 कोटींची बचत आहे. त्यांच्याकडे BMW 530, Toyota Lexus आणि Toyota Vellfire यांसारख्या महागड्या गाड्यांचा ताफा आहे, ज्यांची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. चेन्नईमध्ये त्याचा 70-80 कोटींचा आलिशान बंगला देखील आहे.

चित्रपटांसाठी विजयची फी 100 ते 120 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याच्या आगामी ‘Jana Nayagan’ या चित्रपटासाठी त्याने तब्बल 250 कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *