अंगणात खेळणाऱ्या मुलाच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या, धक्कादायक घटनेने संताप
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरंग आदिवासी वाडीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या पाठीमागे खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाच्या शरीरात चार ठिकाणी गोळ्या किंवा छर्रे घुसल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. या मुलाला या गोळ्या कशा काय लागल्या याचे कोडे उलगडलेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेरळ…