Maharashtra News LIVE : मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची जळगाव मध्ये नोंद
13 Mar 2026 01:28 PM (IST) जळगाव – कॉलेजच्या मेसवर अवलंबून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोठा दिलासा जळगावमध्ये कॉलेजचमधल्या मेसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानंतर महाविद्यालयातील वस्तीगृहांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामुळे हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकाचा प्रश्न सुटला. जळगाव जिल्ह्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे शैक्षणिक वस्तीगृहांमधील…