Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटातील सहा खासदारांवर जोरदार टीका केली आहे. हे खासदार विकासकामांसाठी नव्हे, तर केवळ स्वार्थासाठी शिंदे गटात गेले असून त्यांचा विकासकामांशी काडीमात्र संबंध नाही, असा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले की, जनतेला सर्व गोष्टींची जाणीव असून आगामी निवडणुकांमध्ये मतदार या फुटीर खासदारांना…